अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आयोजित 12जुन 2022 रोजी होणाऱ्या चॅरिटी शो च्या पोस्टर,बॅनर व देणगी प्रवेशिकेचा लोकार्पण सोहळा २३ एप्रिल 2022 रोजी नाचू किर्तनाचे रंगी च्या मंचावर संपन्न झाला. जवाहर नगर येथील कार्यक्रमात ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज महाले,जन अभियान फाउंडेशनचे अविनाश देशमुख व प्रा.विशाल कोरडे यांच्या हस्ते स्वर संध्या बॅनर,पोस्टर व देणगी प्रवेशिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.दिव्यांगांना रोजगार देण्याच्या हेतूने आयोजित खुले नाट्यगृह,गांधी रोड येथे होणाऱ्या टि.व्ही फेम कलावंतांचा कार्यक्रमाला अकोल्यातील सामाजिक संस्था,उद्योजक, व्यापारी व अकोलेकरांनी कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका घेऊन भरभरून सहकार्य करावे. दिव्यांग नोंदणी व प्रवेशिका मिळवण्यासाठी ०९४२३६५००९० हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा* असे आव्हान आयोजन समितीचे अनामिका देशपांडे, प्रा.संतोष हुसे,संजय पिसे ,शिवराज ढगे,श्याम विसपुते, डॉ.विद्या जयस्वाल,तृप्ती भाटिया,शिवा पाटील,मनोज कसूरकर,स्मिता अग्रवाल,पवन मंगळे,प्रसाद झाडे,अक्षय राऊत यांनी केले आहे.