मूल-सावली मार्गावरील चिमढा नदीजवळ एका दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.१) सकाळी अकराच्या सुमारास घडली.विवेक नामदेव कन्नाके (वय ३०, रा. चकमानकापूर) असे मृतकाचे नाव आहे.
सावली तालुक्यातील चक मानकापूर येथील निवासी विवेक नामदेव कन्नाके यांची शेती मूल तालुक्यातील नलेश्वर येथे आहे. आज (दि.१) सकाळी एम एच ३४ बी. एन. १४०६ क्रमांकाच्या दुचाकीने शेताकडे जात होते. यावेळी वर्धा येथील विनोद लक्ष्मण आगरेकर (वय ५०) हे चारचाकी वाहन क्रं. एम. एच. ३२ ए. एस. ६५६७ ने गडचिरोली येथे जात होते. दरम्यान चिमढा नदीजवळ चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक विवेक नामदेव कन्नाके याचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.