वाशिम : तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सदैव कर्तव्य तत्पर असलेले, वाशिम यवतमाळ जिल्हयाचे लाडके व्यक्तिमत्व संजयभाऊ देशमुख यांच्या विजया करीता, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील त्यांच्या प्रत्येक मतदार व कार्यकर्त्यांनी प्रत्येक शहर आणि खेड्यापाड्यातून,वस्ती पाडे तांड्या मधून त्यांच्या मशाल या चिन्हाला जास्तित जास्त भरभरून मतदान होण्याकरीता प्रयत्नाची पराकाष्ठा केली.मतदार संघातील सर्व जातीधर्माचा मतदार राजा स्थानिक उमेद्वार असलेल्या संजयभाऊ देशमुख यांच्या विजयाकरीता तन मन धनाने प्रयत्न करीत होता.आणि अखेर त्यांना भरभरून मतदान झाल्यामुळे दि. 04 जून 2024 रोजी त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्याकरीता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील मतदार राजा सज्ज झाला असल्याचे,कारंजा शहरात राष्ट्रिय काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे,कारंजा शहर कॉग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा कारंजा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना सांगितले.याविषयी पुढे बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की,गेल्या एक दिड वर्षापासूनच संजयभाऊ देशमुख यांनी संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक शहराच्या आणि वस्ती,पाडे,तांडे,गावखेड्याच्या वार्डा वार्डात जनसंपर्क वाढवीला होता.मतदारांच्या सुख दुःखात ते सहभागी होत होते.शिवाय स्थानिक असल्या कारणाने मतदारामध्ये त्यांच्या विषयी उत्साह आणि आपुलकी दिसून येत होती.विशेष म्हणजे भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली होती.तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दलही मतदारामध्ये सहानुभूतीची लाट होती.त्यामुळे मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कॉग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (शरद पवार),आम आदमी इ. सोबतच स्वतः मतदारांनी त्यांच्या विजया करीता प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती.त्यामुळे लोकसभा निवडणूकीत त्यांचा विजय झालेला असून,आता दि. 04 जून 2024 रोजी मतमोजणीनंतर केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे सांगताना माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी भरपूर मताधिक्य घेऊन संजयभाऊ देशमुख आपले लोकप्रिय खासदार होणार असल्याचे म्हटले आहे.