ब्रम्हपुरी तालुक्यात रेती चोरीचे प्रमाण मोठे असून घाट लिलाव होण्यापूर्वी होणारी रेती तस्करी, काही घाट सुरु झाल्यानंतर सुद्धा मोठ्या जोमात होतं असून वैध आणि अवैध च्या खेळात रेती तस्करीचा प्रमाण बिनबोभाट पणे सुरु आहे. आज तालुक्यात राजाश्रयाने अवैध तस्करीत गुंतलेला वाहन काही स्थानिकांनी राजकीय चतुराईने पकडून स्वतः पोलीस स्टेशनं च्या स्वाधीन केल्याने खळबळ उडाली आहे
पिंपळगाव (भोसले) येथे अवैध गौण खनिज रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र. एम एच ३४ बीएफ ८१३४ व वीणानंबर रेती भरलेली ट्रॉली स्थानिक सरपंच व गावकऱ्यांनी शनिवारला सकाळच्या सुमारास पकडून वाहन पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे कायदेशीर कारवाई साठी जमा केला. पोलीस कारवाई मध्ये रेती वाहतुकीचा परवाना नसल्याची बाब ट्रॅक्टर चालक सोपान मधुकर ढोंगे वय 24 रा. पिंपळगाव (भोसले) याने कबूल करीत ट्रॅक्टर मधील रेती पिंपळगाव घाटातून चोरल्याचे सांगत आहे. ट्रॅक्टरचालक याच्याकडून ट्रॅक्टर व ट्रॉली अंदाजे किंमत ५ लाख व १ ब्रास वाळू अंदाजे किंमत ५ हजार असे एकुण ५ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.तर वाहन मालक नांदगाव येथील एक मोठ्या राजकीय पक्ष्याचा पुढारी असल्याचे समजत आहे.
अवैध रेती तस्करी राजकीय प्रभावाने सुरु असल्याने त्यावर प्रतिबंध लावावे अशी मागणी राजकीय मंडळी प्रशासनासमोर मांडत नाहीतं व साधारण नागरिकांच्या जीवाचा खेळ मांडत "वाहत्या गंगेत हात धुण्याचा" प्रयत्न करीत असतात असे आज नागरिकांतून खुलेआम चर्चीले जातं असून सदर वाहणावर जप्ती पंचनामा तयार करून जप्त करण्यात आला असून रेती परवाना नसतांना अवैधपणे वाळूची वाहतूक करून शासनाचे महसूल चोरी केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपीच्या विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.