आरमोरी:-
आरोग्य प्रबोधिनी, देसाईगंज च्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय सभागृह,आरमोरी येथे उद्योजिका एकल विधवा महिलांचा कौतुक सोहळा व सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य पाहुणे म्हणून तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम,पत्रकार प्रविण राहाटे,
कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सूर्यप्रकाश गभणे,अध्यक्ष, आरोग्य अधिकारी, देसाईगंज व एकल महिला उपस्थित होते.
मा.निलेश गेडाम,तालुका कृषी अधिकारी,आरमोरी यांनी उपस्थित एकल महिलांना कृषी विभागातील विविध योजना,लागणारी औषधी,या करिता मिळणारी सबसिडी व लाभ कस घेता येणार या विषयी सविस्तर माहिती दिले त्यासाठी आपण एकल सावित्रीबाईचे विचार पुढे घेऊन महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले निलेश गेडाम यांनी सांगितले यावेळी पत्रकार प्रविण राहाटे,यांनी महिलाना त्यांच्या उद्योग, व्यवसाय करणाऱ्या महिलांचे कौतुक केले.व शुभेच्छा दिले.
या नंतर उद्योजिका एकल महिलांचे सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन आरोग्य प्रबोधिनी कार्यकर्ती पुष्पांजली मातेरे तर आभार आरती पुराम यांनी मानले.
आरोग्य प्रबोधिनी संस्था 2002 पासून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असून शाळा व महाविद्यालय मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती,किशोर वयीन मुलींना वयात येतानाचे मार्गदर्शन,महिला सक्षमिकरण,बालविवाह विरोधी जनजागृती अशा विविध उपक्रमात सहभागी आहे.आरोग्य प्रबोधिनी संस्था ही कोविड काळा पासून एकल विधवा महिला सक्षमीकरण करिता कार्यरत असून या काळात एकल महिलांना शेळी,बकरी वाटप व त्यांच्या पाल्याना चारीटीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत करण्यात आली होती.गडचिरोली जिल्हातील आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील 19 ते 49 वयोगटातील 1200 च्या जवळपास एकल महिलांशी जुळलेली आहे.
एकल महिला सक्षमिकरण व्हावे, स्वावलंबी व्हावेत,स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावेत या उद्देशाने एकल महिलाना जिल्हा स्तरीय कृषी महोत्सव येथील विविध व्यावसायीक स्टॉलची भेट, विविध अधिकाऱ्यांची भेट घडवून देणे, मार्केटिंग विषय,स्वयं रोजगार विषय कार्यक्रम घेणे. उमेद व माविम च्या विविध शासकिय व निमशासकीय योजनांची माहिती देणे. असे विविध उपक्रम आरोग्य प्रबोधिनी करीत असते.तसेच ज्या एकल महिला स्वयं रोजगार करूण कुटुंब सांभाळत आहेत. स्वावलंबी आहेत.अशा महिलांची भेट घेवुन त्यांच्या रोजगार विषय माहिती घेण्यात आली व आरोग्य प्रबोधिनी च्या वतीने त्या उद्योजिका महिलांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....