वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : शासकीय तंत्रनिकेतन येथे एनबीए प्रक्रीया व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर १८ व १९ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कार्यालय तंत्रशिक्षण संचालनालय नागपूरचे सहसंचालक डॉ.एम.बी. डायगव्हाणे,विभागीय कार्यालय तंत्रशिक्षण संचालनालय अमरावतीचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. मानकर, प्रमुख मार्गदर्शक स्वयचल अभियांत्रिकी विभाग नागपूरचे विभागप्रमुख डॉ. जी. के. आवारी, विभाग प्रमुख डॉ. एम. व्ही. सरोदे, श्री. पी. बी. उत्तरवार, शिरभाते, संस्थेचे प्राचार्य डॉ. बी. जी. गवलवाड, डॉ. एन. व्ही. राउत, के. पी. जोशी, यु.ए. बागडे, आर. एन. जरुडकर, एस. एम. खेरडे, झे.ए.खान व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना डॉ. आवारी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पदवी घेत असतांना विद्यार्थ्यांना आवडत्या विषयाचे शिक्षण घेता येणार आहे. तसेच मेजर, मायनर, बहुशाखा, आंतरशाखा, सहअभ्यासक्रम, प्रकल्प, उपक्रम व कौशल्य याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. डायगव्हाणे यांनी एनबीए प्रक्रिया व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी उपयोगी असल्याचे सांगितले. डॉ. मानकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम समावेश करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांना सकारामात्मक दृष्टीने घेणे आणि यशस्वी अंमलबजावणीकरीता सहकार्य करणे सगळ्यांचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. सरोदे यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. बी. जी. गवलवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल महत्वपूर्ण ठरणार असून त्याचे स्वागत केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे संचालन ए. डी. ढोले व उपस्थितांचे आभार व्ही. एस. जोशी यांनी मानले. कार्यशाळेला संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता संस्थेचे प्राचार्य, विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.