रखरखत्या प्रखर अशा उन्हाळ्यात एकीकडे तापमानाने उच्चांक 43 अंश सेल्सियस पर्यंत मजल गाठलेली असतांना अंगाची लाही लाही होऊन सर्वांगाला घामाच्या धारा वाहत असतात . सर्वसामान्य नागरिक विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा ,जसे की एसी, कुलर, फॅनचा आसरा घेत असतांनाच, अकस्मात महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर, विजनिर्मिती करण्याकरीता लागणाऱ्या कोळशाचं संकट कोसळलं आणि परत एकदा महाराष्ट्र लोडशेडींगच्या असह्य खाईत लोटला जात आहे . त्यामुळे महाराष्ट्रात मनात येईल तेव्हा दिवसातून पाच ते सहा वेळा आणि रात्रीला सुद्धा संपूर्ण रात्र रात्र, कोणतीही पूर्वसुचना न देता, अघोषित लोडशेंडीग केल्या जात असल्याने, आजारग्रस्त, वयोवृद्ध, विद्यार्थी व सर्वसामान्याचे प्रचंड हाल होत आहेत .
व त्यामुळे विज वितरण कंपनीने "अघोषित"असे "मनात येईल तेव्हा" लोडशेंडीग करू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे . विज वितरण कंपनीने, लोडशेडींगचे काहीतरी ताळमेळ किंवा वेळापत्रक ठरवून, पूर्वसुचना देऊनच लोडशेडींग करण्याची मागणी पुढे येत आहेत . तसेच रात्रीच्या वेळेला दिवसभर श्रम परिश्रमाने थकलेल्या नागरीकांना विश्रांती मिळावी म्हणून रात्रपाळीचे लोड शेडींग करूच नये अशी विजग्राहक जनता जनार्दनांची रास्त मागणी आहे.
तसेच ऐन मध्यावर असलेल्या प्रखर उन्हाळ्यात , भर दुपारी विश्रांतीच्या वेळेवर सुद्धा लोडशेडींग करू नका .यातून महाविकास आघाडी सरकारने काहीतरी मार्ग काढावा . अशी नागरीकांची मागणी असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे कळवील आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....