वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) सध्या मृग नक्षत्रा सोबतच महाराष्ट्र राज्यात मान्सूनच्या पाऊसाला सुरुवात होण्याचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकरी राजाने बि बियाणे खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळवीला असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. बि बियाण्याचे वाढते भाव असल्यामुळे,शेतकर्याची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपल्या शेतात धान्य पेरणी करणाऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केन्द्र व दुकानदारांकडूनच, बि बियाणे खरेदी करावी व कोणी तुम्हाला कमी किमतीत किंवा काळ्या बाजारातून बियाणे खरेदी करण्याचे आमिष दाखवीत असेल. तर त्याला बळी पडू नका. तसेच बियाणे खरेदी करतांना, बिलाची पक्की पावती घ्यायला विसरू नका असे विनंतीवजा आवाहन करंजमहात्म्य परिवाराकडून करण्यात येत आहे .