आम्ही ब्रम्हपुरी तालुक्यातील गाव खेड्यात राहणारे विद्यार्थी आहोत. आमचे गाव (गांगलवाडी, मुई, रुई, निलज, पाचगाव, खरकाडा, रणमोचन, किन्ही) हे ब्रम्हपुरी पासून १५-२० किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही विद्यार्थी ब्रम्हपुरी शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत आहोत. सर्वच महाविद्यालयाचा वेळ हा सकाळ (स. ७.३० ते ११.३०) पाळीला आहे.
परंतु आमच्या गावावरून जाणारी बस हि वेळेत येत नसल्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. सकाळी आमचे महाविद्यालय ७.३० सुरु होत असते. परंतु आरमोरी/गांगलवाडी मार्गे ब्रम्हपुरी येणारी बस सकाळी ८.०० वाजता दरम्यान येत असल्यामुळे आम्हाला महाविद्यालयांत पोहचायला ८.३० ते ९.०० वाजतात त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ब्रम्हपुरी वरून आरमोरी/गांगलवाडी मार्गे जाणाऱ्या बसचा काही निश्चित वेळ नसल्यामुळे तासंतास बस स्टॉप वर ताटकळत राहावे लागते. ती कधी दुपारी १.०० तर कधी २.०० वाजता ला येत असल्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो.
तरी महोदय आपणास विनंती आहे की, आम्ही आपणाकडे मोठ्या अपेक्षेने आलो आहोत.आम्हाला आमच्या गावापर्यंत बस सेवा कॉलेज वेळात उपलब्ध करून दिली जावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे जीवन उद्धारेल. साहेब आमच्या मागणीचा विचार व्हावा. अशी मागणी गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल विद्यार्थी गणेश शेंडे तसेच सोबतीला प्रशांतजी डांगे पत्रकार, कुणाल राऊत, यांनी नितीन झाडे, यांनी आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन यांना केली आहे.