एक जानेवारी १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे ५०० शूरवीरानी २८ हजार पेशव्यांचा पराभव केला. सदर घटनेची नोंद इतिहासात कोरली गेली असून पराक्रम गाजविणाऱ्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात १ जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर हे होते . कार्यक्रमाला माजी प्राचार्य विनोद शेंडे ,धर्मा बांबोळे, प्रदीप रोडगे पुंडलिक इंदुरकर, हिरालाल वालदे, रामहरी वाटगुरे, लोणारे, जयकुमार शेंडे,भारती मेश्राम, अंजली रोडगे,प्रज्ञा निमगडे मिना सहारे,विद्या चौधरी, कुमता मेश्राम, लता बारसागडे, भावना बारसागडे, भूमिका बागडे, शालिनी सुखदेवे, सह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
तथागत बुद्ध विहारातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भीमा कोरेगाव येथील शहीद झालेल्या शूरवीराना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तथागत बुद्ध विहारात त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी माजी प्राचार्य विनोद शेंडे धर्माजी बांबोळे, प्रदीप रोडगे रामहरी वाटगुरे, कुमता मेश्राम यांनीही शौर्य दिनाचा इतिहास आणि आंबेडकरी चळवळ याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मिना सहारे यांनीही शौर्य दिनावर गीत सादर केले.
कार्यक्रमाला समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.