कारंजा (लाड) : माजी राज्यमंत्री स्व. बाबासाहेब धाबेकर पाटील यांचे सुपूत्र तथा वंचित आघाडीचे उमेदवार सुनिल पाटील धाबेकर हे मुळात धार्मिक आध्यात्मिक व सामाजिक प्रवृत्तीचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या दिवसाची सुरुवात ते देवदर्शन आणि महामानवाच्या दर्शनाने करतात. शुक्रवार दि.15 नोहेंबर रोजी त्रिपुरारी पोर्णिमा असल्यामुळे त्यांनी प्रचाराला जाण्यापूर्वी सर्वप्रथम प्रातःकाळीच निवडक मातृभक्तांना सोबत घेऊन, श्री कामाक्षा देवी मंदिर गाठले व श्रध्दापूर्वक भाविकांची इच्छापूर्ती सिद्ध मातृशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजकरांच्या आराध्य दैवताचे आई श्री कामाक्षा मातेचे दर्शन घेतले. उल्लेखनिय म्हणजे आसाम येथील गोहाटीच्या श्री कामाख्या पिठाचेच हे मातृशक्तीपिठ म्हणून ओळखले जाते. यावेळी श्री कामाक्षा देवीचे पूजनानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष दिगंबर पंत महाजन ; श्री कामाक्षा देवीचे मुख्य गोंधळी संजय कडोळे तसेच सचिव रोहीत महाजन यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा यथोचित मानसन्मान करीत त्यांना विजया बद्दल भरभरून आशिर्वाद दिले.