कारंजा : मी ना कोणता अधिकारी ना कोणता नेता. मी तर अगदी दारिद्रयावस्थेत जीवन जगत असणारा सर्वसामान्य माणूस,साधा व्यक्ती.मला रहायला स्वतःच्या मालकीचे किंवा बापदाद्याकडून मिळालेले हक्काचे घर नाही. किंवा घरकुल नाही.त्यामुळे मी श्री कामाक्षा देवी संस्थानच्या आश्रयाने राहतो.दिव्यांग असून कमाईचे कोणते साधनही नाही.आणि त्याबद्दल माझी तक्रारही नाही.स्वतःचे जीवन जगत असतांना समाजाप्रती व्रतस्थ राहून,आपण समाजाचे देणे लागतो.या कर्तव्य भावनेने स्वतःला समाजसेवेत गुंतवून ठेवण्याचा माझा छंद.त्यातून मात्र मी जे काही असंख्य मित्र मंडळीचे वलय जमविले.त्याला कोठेही तोडच नाही.खरे तर माझी मित्रमंडळी हीच माझी धनसंपत्ती. हीच माझी आयुष्याची पुंजी.आज रोजी माझे मित्र बंधु आणि माझ्या बहिणी माझ्यावर आत्मविश्वासाने जे काही प्रेम करतात.त्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. त्यांचे ऋण मी या जन्मात तरी फेडू शकणार नाही.आपल्या असंख्य मित्रमंडळीच्या हृदयात मी माझे स्थान निर्माण करू शकलो.त्यांचा विश्वास त्यांचे प्रेम साध्य करू शकलो.ह्याचा मला सार्थ स्वाभिमान आहे.असे उद्गार संजय कडोळे यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी बंधु भगीनींचे जाहिर आभार प्रगट करतांना व्यक्त केले आहे.