कारंजा (लाड) : -- कारंजा शहर व ग्रामीण भागात काँग्रेसच्या बळकटी व मजबुती करीता
शुक्रवार दि.01 डिसेंबर 2023 रोजी , भव्य जनसंवाद सभेचे आयोजन महात्मा फुले चौक येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे.तरी कृपया जास्तित जास्त काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यकमाचे उद्घाटक म्हणून देवानंद पवार सरचिटणीस (संघटन व प्रशासन) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष व आमदार अमितजी झनक तर आमदार धीरजजी लिंघाडे,अकोला महानगरपालिकेचे काँग्रेस गट नेते साजिदखान पठाण , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बलदेव महाराज राठोड,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे महासचिव ॲड.दिलीपराव सरनाईक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव दिलीप भोजराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी सर्व काँग्रेस प्रेमी व नागरीकांनी कार्यकमाला उपस्थित रहावे असे आवाहन
कारंजा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमीरखान पठाण व कारंजा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राज चौधरी यांनी केले असल्याचे जिल्हा सेवादल काँग्रेसचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.