वाशिम : आपले संपूर्ण आयुष्य श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरीच्या कार्याला समर्पित करून, निव्वळ व्यसनमुक्ती साठी कार्य करणारे, खऱ्या अर्थाने व्यसन मुक्तीचे पुजारी असलेले, मानोरा तालुक्यातील जनुना खूर्द येथील हभप लोमेश महाराज पाटील चौधरी यांनी आपल्या आजवरच्या जीवनात अनेक व्यसनाधिन व्यक्तिंना आपल्या प्रबोधनाद्वारे व्यसनमुक्त केले आहे. कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे ते विश्वस्त संचालक असून मानोरा तालुका अध्यक्ष आहेत. कलावंताना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरीता सुद्धा त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांच्या खांद्याला खांदा लावून आपले कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना ज्ञानगंगा साहित्य मंडळाचा राज्यस्तरिय ज्ञानमुर्ती पुरस्कार तसेच मदत सामाजिक संघटना नागपूरचा राज्यस्तरिय राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळालेला असुन नुकताच त्यांना नाशिक येथील समारंभात एड कृष्णाजी जगदाळे यांच्या वतीने मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा - "आदर्श कार्यगौरव पुरस्कार" मिळालेला असून त्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांना दिले आहे.
तसेच पुरस्कार मिळालाबदल त्यांचे पालकमंत्री ना संजयभाऊ राठोड,जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील , माजी जिप सभापती जयकिसन राठोड, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील राऊत, विजय ठाकरे, राजाराम पाटील राऊत, सप्तखंजेरी प्रबोधनकार पंकजपाल राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.