अकोला_वृक्ष लावा वृक्ष जगवा कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ येथे स्थानिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने संपूर्ण प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजप नेते डॉ अशोक ओळंबे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नितीन गायकवाड होते.यावेळी बदलते ऋतू व बदलते तापमान मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणारी इलेक्ट्रिकल उपकरणे यामुळे ओझोन वायूची कमी भासत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णतामान वाढले असून ऑक्सिजनची कमतरता भासत आहे आगामी काळामध्ये परिस्थिती बिकट होणार असून वेळीच नागरिकांनी दखल घेवुन आपल्या आईच्या नावाने आईला सोबत घेऊन वृक्ष लावण्याचा संकल्प करावा असे आव्हान डॉ अशोक ओळंबे यांनी केले. कार्यक्रमाला सचिन बोरेकर निखिल पिंपळकर महेश मावळे राजेश असोले अंकुश धूळ शुभम मुलंकर गोकुळ लव्हाळे प्रिया हागोणे मोनिका रायसिंग यांची उपस्थिती होती.