अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिव्यांग बांधवांच्या रोजगारासाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . *दि.२१ ते २३ जुलै २०२५ रोजी जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत उमंग महिला ग्रुप तर्फे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे*. सदर प्रदर्शनी मध्ये दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे *दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध शोभिवंत वस्तूंचे भव्य दालन उपलब्ध करण्यात येणार आहे . अगरबत्ती, धूप, वाती, फुल वाती, पूजेचे साहित्य, कापडी पिशव्या, लोकरीचे साहित्य, कागदाची फुले, देवाची वस्त्रे, आयुर्वेदिक फेसपॅक, मेणबत्ती व बांबूची शोभिवंत कलाकृती दिव्यांग व्यक्तींनी संस्थेच्या मार्गदर्शनात तयार केली आहेत* . या वस्तूच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग बांधवांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती श्री शिवाजी महाविद्यालय अकोल्याचे सहयोगी प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी दिली आहे . उमंग कला प्रदर्शनीला भेट देऊन अकोलेकरांनी सहकार्य करावे अधिक माहिती करिता ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान आयोजन समितीच्या अनिता उपाध्याय व मोनिका राठी यांनी केले आहे . दिव्यांग सक्षमीकरणाच्या सदर सामाजिक उपक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .