स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, कारंजातील सुप्रसिद्ध जे.डी. चवरे विद्यामंदिरात दिनांक 16 ऑगस्ट रोजी, 'विज्ञान प्रदर्शनी' तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा या दृष्टीने 'कचऱ्यातून कला' आणि 'चित्रकला प्रदर्शनीचे' आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी केले. विज्ञान प्रदर्शनीमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण अशा सत्तर प्रकल्पांची मांडणी केली होती. यामध्ये पाच ते सात या गटांमध्ये प्रथम क्रमांक नंदिनी संदीप गाडबैल हिच्या चंद्रयान प्रकल्पाला मिळाला. दुसरा क्रमांक स्निग्धा राहुल आखाडे हिने केलेल्या clothes dryer या प्रकल्पास मिळाला तर अश्विनी प्रवीण ठाकरे आणि पूर्वी उमेश राऊत ह्या विद्यार्थिनींनी केलेल्या शेतीच्या प्रकल्पास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. इयत्ता आठ व नऊ या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक स्मार्ट सिटी या प्रकल्पास प्राप्त झाला. यामध्ये सहभागी विद्यार्थी होते अर्णव नरेश चव्हाण आणि प्रज्वल सचिन चौधरी, (Soil moisture monitoring) ह्या प्रकल्पास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हा प्रकल्प ओजस विवेक गहाणकरी आणि लोकेश मनोज राठोड या विद्यार्थ्यांनी केला. तृतीय क्रमांक प्राप्त केला, हरीओम अमोल भोयर यानी (Missile inner part) प्रकल्प केला होता. सदर प्रदर्शनीचे परीक्षण शाळेतील विज्ञान शिक्षक अजय मोटघरे, यशवंत गांभवा आणि अभिजीत देशपांडे यांनी केले. कचऱ्यातून कला आणि चित्रकला प्रदर्शनी मध्ये इयत्ता 5 ते 9 च्या 118 विद्यार्थ्यांचे प्रकल्प होते. कागदकाम ह्या उपक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त केला, श्रुती भरत जाधव द्वितीय क्रमांक सम्यक विशाल गुळदे तर तृतीय क्रमांक कृष्णा दिगंबर पाटील ह्या विद्यार्थ्यांनी पटकावला. मातीकाम या उपक्रमात प्रथम क्रमांक सौम्य मंगेश सरोदे, द्वितीय क्रमांक स्निग्धा राहुल आखाडे तर तृतीय क्रमांक सिद्धेश विनोद बगीकर या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. चित्रकला प्रदर्शनीत प्रथम क्रमांक आराध्य भगवान देवळे, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी प्रमोदराव लळे तर तृतीय क्रमांक मल्हार सचिन लोटे या विद्यार्थ्यांनी पटकावला. सदर प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून यशवंत गांभवा, महेंद्र धनस्कर, अनिरुद्ध बीजवे आणि अमित राऊत यांनी काम सांभाळले.
संपूर्ण प्रदर्शनीच्या आयोजनाकरिता प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी मार्गदर्शन केले तर सर्वांगीण विकासाकरिता विद्यार्थ्यांनी उपक्रमांमध्ये अशीच नाविन्यता आणावी, अशा शब्दात शाळेच्या अध्यक्षा डॉ. लीना उदय चवरे त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय सदस्य श्री प्रमोद चवरे, विनम्र चवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.