वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या, पावसाळी अधिवेशनात, विधानपरिषदेत अनेकवेळा तारांकित प्रश्न . उपस्थित करून आणि प्रत्यक्षात स्वतः जातीने मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे. उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस,दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च शिक्षण मंत्री यांची जातीने प्रत्यक्ष भेट घेऊन,अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे हजरजवाबी व कर्तव्यतत्पर आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी शिक्षकांचे विविधांगी प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न कसोशीने केलेले आहेत.शासनानेही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्याचे आश्वासित प्रगती योजनेच्या कालबद्ध पदोन्नती वेतनवाढीला मंजूरी दिल्यामुळे अखेर हा प्रश्न निकाली लागलेला असून सर्वच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थासह,नगर पालिका व खाजगी शिक्षण संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच आश्वासित प्रगती कालबध्द पदोन्नती व शिक्षकांच्या न्यायहक्काची पदोन्नती मिळून, लवकरच सर्वच शिक्षकांना लाभ मिळणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळालेले असून,अनेक ठिकाणी प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात सुध्दा झालेली असल्याने शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांचे अभिनंदन होत असल्याचे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे .