कारंजा (लाड) : जिल्हा होण्याकरीता मजबूत बाजू असतांना कारंजा शहराला डावलल्या गेले. स्थानिक शेतकऱ्याच्या सुपिक शेतजमीनी घेऊन समृद्धी महामार्गाकरीता शासनाने जमिनी घेऊन शेतकर्यांना भूमिहिन केले. समृद्धी महामार्ग नेतांना स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून दिशाभूल केली.शहरात औद्योगीक वसाहत (M I D C ) निर्माण केली नाही.ऐतिहासिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,व्यापारी, तिर्थक्षेत्राची नगरी असतांना येथील जनतेच्या मुलाबाळांच्या भविष्या करीता उच्च शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था केली नाही.ही कारंजा नगरीची शोकांतिका आहे. राजकिय नेते व पक्षाने कारंजा नगरीच्या विकासाकरीता आवाज उचलणे गरजेचे असतांना त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेणाऱ्या सत्ताधारी आणि राजकिय स्वार्थापुरते मताचा जोगवा मागणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना,सामान्य नागरीक या नात्याने संजय कडोळे यांनी आवाहन केले आहे की, आता तरी उठा ! जागे व्हा !! कारंजा नगरीला शासनाने तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ जाहीर करून तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यानुसार या शहराचा विकास करावा म्हणून प्रतिज्ञा घ्या. शासनाला या शहराचा तिर्थक्षेत्र व विकास आराखडा तयार करण्यास बाध्य करा. आमदार, जिल्हापरिषद, नगर परिषद लोक प्रतिनिधी यांनी जिल्हा नियोजन समिती मध्ये कारंजाच्या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाबाबत चर्चा घडवून विकास निधी मंजूर करावा. व स्थानिक मजूर, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. याकरीता शुक्रवार दि . 08 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता विद्यमान तहसिलदार कुणाल झाल्टे साहेब यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरीकांनी आपल्या मातृभूमि कारंजा नगरीच्या विकासाकरीता आणि मुलाबाळांच्या भविष्याकरीता तहसिल कार्यालय येथे स्वयंस्फूर्तीने एकत्र येण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून करण्यात आले आहे.