कारंजा (लाड) : अतिपरिश्रम, दगदग, अवेळी जेवण इत्यादी कारणामुळे सध्या रक्तदाब, शुगर इत्यादी प्रकारचे रुग्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेकदा रुग्नांना अचानकपणे हदयविकाराचे धक्के येतात. अशावेळी तळागाळातील गोरगरीब रुग्नांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्नालयात भरती केले जाते. परंतु सदर्हु रुग्नालयात हृदय रोग विशेषज्ञ उपलब्ध नसल्यामुळे रुग्नांवर वेळीच उपचार केले जाऊ शकत नाहीत अशाप्रसंगी उपजिल्हा रुग्नाल्या कडून रुग्नांना अकोला - अमरावती करीता पाठवीले जाते परंतु अनेकदा जलद उपचाराअभावी अकोला अमरावती कडे मार्गक्रमण करीत असतांना वाटेतच रुग्नांचा मृत्यु होतो.तळागाळातील गोरगरीब रुग्नांचे कुटूंबीय हे खाजगी रुग्नालयात हृदयरोग्यावर उपचार करू शकत नाहीत. त्यामुळेआज रोजी शासनाने,कारंजा शहराची वाढती प्रचंड लोकसंख्या आणि रुग्नांचे प्रमाण पहाता स्थानिक उपजिल्हा रुग्नालयातच हृदयरोग विशेषज्ञाची पदभरती करणे अत्यावश्यक आहे.परंतु बऱ्याच दिवसाच्या या मागणीकडे शासन गांभिर्याने बघायला तयार दिसत नाही . म्हणूनच शासनाला जाग आणण्याकरीता स्थानिक महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थानिक तहसिलदार डॉ अपूर्वा बासूर मॅडम (भा.प्र.से.) यांचेमार्फत नुकतेच शासनाला उपजिल्हा रुग्नालयात हृदय रोग तज्ञाची नेमणूक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांना दिलेली आहे.सदर निवेदन देते वेळी कारंजा शहरातील गवळी समाजाचे बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.असे वृत्त जुम्माभाई बंदुकवाले, लियाकत मुन्निवाले यांनी कळविले आहे.