वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील पहिल्या फळीतील भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमिवर बंजारा समाजाला आकर्षित कसे करता येईल याकडे लक्ष्य वेधलेले असून त्या करण्याकरीता, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे समस्त बंजारा धर्मियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सद्गुरू धर्मपिठ असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी दौऱ्यावर येत संत मंडळीचे आशिर्वाद घेणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 11.55 वाजता मुंबई येथून विमानाने अकोला विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.05 वाजता हेलीकॉप्टरने वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील वसंतनगर (पोहरादेवी) कडे प्रयाण करतील. दुपारी 12.35 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) येथील हेलीपॅडवर हेलीकॉप्टरने आगमन. दुपारी 12.40 वाजता मोटारीने पोहरागडकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता पोहरागड येथे आगमन व दर्शनाकरीता राखीव. दुपारी 1.10 वाजता मोटारीने सभा स्थळाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता सभास्थळ येथे आगमन व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 2.45 वाजता वसंतनगर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) हेलीपॅड येथे आगमन आणि लगेच दुपारी 4.00 वाजता हेलीकॉप्टरने अकोला विमानतळाकडे प्रयाण करतील.