कारंजा (लाड) : मुले सुस्थितीत असूनही, घरातून परागंदा झालेल्या,निराधार झालेल्या दोन वयोवृद्ध जोडप्यांच्या औषधोपचारासाठी व उदरनिर्वाहासाठी अल्पशी ठरवीक रक्कम आणि धान्य व किराणा देवून,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा व साप्ताहिक करंजमहात्म्यच्या सदस्यांच्या वतीने समाजसेवक संजय कडोळे यांनी त्यांना मदत केली आहे.निराधार असूनही स्वाभिमान बाळगून,मुलासुनांचे नाव बदनाम होऊ नये.ह्या उद्देशाने आमचे नाव गुप्त ठेवा असा वयोवृद्धांचा आग्रह असल्यामुळे त्यांची नावे प्रसिद्ध न करता,त्यांना मदत करणाऱ्या समाजसेवक संजय कडोळे यांनी सांगीतले की, "समाजात आईवडिलांना त्यांची मुले व सुना परागंदा करीत असल्याबद्दल तिव्र दुःख होत असून केव्हा केव्हा प्रचंड संतापही वाटतो. परंतु असो आपले जीवन नश्वर आहे.पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे केव्हा प्राण निघून जाईल.हे सांगता येत नाही.तेव्हा आपल्या मिळकती मधील घासातला घास इतरांना दिला पाहीजे.आपल्याकडे धनसंचय करून स्वार्थ साधून पापाचे भागीदार होण्यापेक्षा आपल्या सभोवतालच्या गरजू,वयोवृद्ध, दुर्धर आजारग्रस्त,दिव्यांग,निराधारअनाथ व्यक्तींना "फुल ना फुलाची पाकळी"देवून म्हणजेच कमितकमी जेवढी मदत आपण इतरांना करू शकतो.तेवढीच मदत करून आणि दुःखितांचे अश्रू पुसून पुण्यसंचय करायला हवा. असे आवाहन त्यांनी केले आहे.व प्रत्येकाने अन्नपूर्णेची आराधना करीत निदान कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्री संदेशाची जाणीव ठेवून इतरांना मदत करायला हवी.पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले, आपल्या अनेक साधुसंतानी आणि भिक्षुगीरी करणाऱ्या भिक्षुकांनीही घरोघरी फिरून, स्वतःच्या भिक्षेचे धनधान्य इतर गरजूंना दानधर्म करीत असल्याची अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.