गडचिरोली :- सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, २६ जून रोजी सकाळच्या सुमारास गडचिरोली आरमोरी मार्गावर साखरा नजीक घडली शेखर बिसन भोयर(३७) रा. पोर्ला असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शेखर हा आज सकाळच्या सुमारास गडचिरोली- आरमोरी मार्गावर फिरायला गेला होता. दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच(३७) रा. पोर्ला असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शेखर हा आज सकाळच्या सुमारास गडचिरोली- आरमोरी मार्गावर फिरायला गेला होता. दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच घटनास्थळ मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले चालकाविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.