जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे मका,सोयाबीन, पिकांना कोंब फुटले आहेत. कपाशी पिकांचा बोंड्या सडत आहेत.
यादरम्यान जाफराबाद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सुरेखा ताई लहाने यांनी जाफराबाद तालुक्यातील विरखेडा भालकी येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची दि.27.वार.शुक्रवारी पाहणी केली. तसेच सौ.सुरेखा लहाने नी थेट बांधावर जाऊन पाहणी करून जाफराबादचे तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना फोन करून तातडीने पंचनामे करण्याचा सूचना दिल्या.