मनिष रक्षमवार म्हणजे संवेदनशील पत्रकार यात काही शंका नाही. गेल्या तीन वर्षापासून माझी मैत्री जमली समाजात वावरताना अनेक चांगल्या, वाईट प्रसंगाचा धीराने सामना करावा लागतो. नातेसंबंध, मित्र परिवार, सगेसोयरे यांचे हितसंबंध जोपासावे लागतात. याचा विचार करणारे, समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव ठेवून काम करणारे आमचे सहकारी मित्र श्री.मनिष रक्षमवार म्हणजे एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व.सामाजिक सेवा सुरू करून आपली कौटुंबिक आर्थिक जबाबदारी पार पाडत असताना देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या मदतीने सामाजिक अडीअडचणीवर भाष्य करून, चांगल्या बातम्याच्या माध्यमातून आवाज उठवून प्रशासनाला जाग आणण्याचे काम करत समाजासाठी एक आदर्शवत काम करणारे, द ग्रेट मनिष.. शिक्षण आयुष्याची कमाई आहे. त्यामुळे जिवन सुधारणा करणारी शाळा व्यवस्थापन सुधारणा होण्यासाठी प्रयत्नशील राहणारे, सुपरिचित, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असणारे आमचे सहकारी मित्र,आपणास वाढदिवसाच्या दीर्घायुषी शुभेच्छा....