वणी (यवतमाळ) : काल बुधवारी लागलेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनीला कमी गुण मिळाल्याने घरीच ओढणीने गळफास घेऊन जिवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना आज गुरूवारी (9 जून) ला उघडकीस आली आहे. सेजल अनिल सालुरकर (वय 17) असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील लालगुडा येथील रहिवासी होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात येऊन तिने हे टोकाचे पाऊल् उचल्याची माहिती समोर आली आहे.
वणी तालुक्यातील लालगुडा येथील रहिवासी असलेली सेजल ही बारावी मध्ये होती. काल बुधवारी बारावीचा निकाल लागला आहे. या निकालात तिला फक्त 65 टक्के गुण मिळाल्याने तिने निराश झाली. नैराश्यात येऊन जिने आज गुरूवारी घरीच ओढणीने गळफास घेऊन जिवनयात्रा संपविली. विशेष म्हणजे तिने दहावीमध्ये 90 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले होते. सेजलने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे तिच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. मुलीच्या मृत्यूने तिची प्रकृती बिघडली असून तिच्यावर वणी शहरातील एका रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. मृतक सेजलचे वडील अनिल गवंडी काम करतात. तर आई मोलमजुरी करते. या मिळकतीतून ते मुलीला शिकवित होते.
मात्र तिच्या टोकाच्या भूमिकेमुळे तिचा जीव गेला असून या घटनेचा आई वडिलांना धक्का बसला आहे. सेजल ही शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. गरीबीची परिस्थीती असतानाही ती शिक्षणात हुशार होती. तिच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.