तालुक्यातील खरकाडा येथील नंदकिशोर ढोरे वय २२ वर्ष हा युवक ब्रम्हपुरी येथील मंगल कार्यालयात कामावर होता. तेथील काम आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी येत असतांना वाटेत त्याचा अपघात झाला. अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असतांना डाॅक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
तेव्हा सदरची बाब खरकाडा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना ज्येष्ठ नागरिक पटवारी ढोरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेशजी ढोरे, ग्रा.पं. सदस्य प्रफुल ठाकरे, खरकाडा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव ढोरे, शंकर ढोरे, जगदीश ढोरे, दिगांबर ठाकरे, नामदेव वाघधरे, दिवाकर ठाकरे, नरेश दोनाडकर, रेवण ठाकरे, भाग्यवान ठाकरे, नामदेव पिलारे हे यावेळी उपस्थित होते.