आरमोरी-
आरमोरी येथील कोहळी समाजातर्फे कोजागिरी निर्मात्याने स्नेहमिलन सोहळा वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील पाटील लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मला.सेवानिवृत तलाठी शंकरजी सुकारे साहेब, सत्कारमूर्ती डा. ओमप्रकाशजी नाकाडे ना.शालीक पा. नाकाडे,प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती स्नेहा राजू घोनमोडे,मा प्रकाशजी पुस्तोडे,प्र.सुधिरजी भाकरे, होमेश्वरजी बालबुड्ढे, मा. पंकज लोघे, मा.जनजिवन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते
सर्वप्रथम व्यासपिठावरील मान्यवरांचे शुभहस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर व्यासपिठावरून कोजागिरी सणाचे औचित्य सांगून मान्यवरांनी समाजातील शेती,शिक्षण व वैद्यकिय क्षेत्रातील समाजाने केलेली प्रगतीविषयी माहीती सादर करून कोहडी समाजाने भविष्यात सुद्धा बदलत्या काळानुरूप वेळेचे महत्व व सामाजीक एकोपा टिकविण्याचे मंचकावरून आवाहन करण्यात आले. यावेळी आरमोरी येथील 28 कोहळी समाज कुटुंब सहभागी झालेले होते यांचे सपत्नीक शाल,भेटवस्तू देवून समाजातर्फ गौरवले. कार्यक्रमाचे औचित्य साधून सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकमाला आरमोरी येथील सर्वश्री मा. रमेश घोनमोडे,प्रा.माणीक बोरकर,प्रा.विजय झोडे,मा. दामोधर घोनमोडे, प्रा. आनंद झोडे, प्रा. गजानन बोरकर, शेषराव बनसोड, मा. दिलीप नाकाडे,दिनानाथ बोरकर, श्रीमती
मालतीबाई अशोक गायकवाड, ओमप्रकाश नाकाडे,गणेश सुकारे, मा. हरिश्चंद्र डोंगरवार, रोहित बन्सोड, नाशिक मुंगुलमारे आदी सहकुटुंब उपस्थिती दर्शवून कार्यक्रमची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दुर्वास बुद्धे,सुत्रसंचालन विकास बोरकर व उपस्थित समाज बांधवांचे आभार नाजूक रुपमोडे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....