राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजित करण्यात आले असून सुरुवात आज ४ ऑक्टोबर पासून संवाद यात्रा सुरू करण्यात आली. चिमूर शहरात दिनांक 9
ऑक्टोंबरला पोहचली शेतकरी भवन सभागृहात या संवाद सभेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी नियोजित सभेचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर होते. कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष श्याम लेडे. राष्ट्रीय प्रवक्ता वृषभ राऊत, राज्य उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे. माजी आमदार अविनाश वारजूकर. धनराज मुंगले. संजय पिटाडे. महिला जिल्हाध्यक्ष भावना बावनकर. आदी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी बांधवांसी संवाद साधत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे संवाद साधून दिली. प्रमुख मार्गदर्शक वृषभ राऊत यांनी ओबीसी समाज निद्रिस्त असून त्याला जागे करणे हे आव्हानात्मक काम आहे. या समाजाला जागे करण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली अविरत सुरू आहे असेही ते म्हणाले. यावेळी ओबीसी. योद्धा रवींद्र टोंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचे हस्ते संदीप उपरे, प्रदीप कामडी, भूषण कावरे, सुनील हिंगनकर, किशोर येळणे, दुर्गा सातपुते, लक्ष्मी शिवरकर, कपिला चावरे. दिपाली मेश्राम. गीता हेडाऊ. माधवी अगडे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास कामडी, संचालन प्रभाकर पिसे. मीनाक्षी बंडे. यांनी केले तर आभार लक्ष्मी शिवरकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ. ओबीसी महिला महासंघ. कर्मचारी अधिकारी महासंघ. ओबीसी युवा महासंघ. विद्यार्थी महासंघ. सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले