अकोला दि. २६ जानेवारी १९५० प्रजासत्ताक दिनी ३९५ कलमे २२ प्रकरणे आणि ९ परिशिष्ट असलेल्या भारतीय संविधानाचा अलम सुरू झाला आणि भारत देश सर्व प्रजेची सत्ता असणारा प्रजासत्ताक भारत देश बनला डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता क्रांतिकारी प्रवर्तने आणता येतील अशी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही कशी अवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होती. भारतीय संविधानाने लोकशाही आणि राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम दिला आहे सामाजिक न्याय हे उद्दिष्ट संविधानाच्या प्रस्ताविकेत तसेच समाविष्ट आहे मालमत्तेचे वाटप न्याय पद्धतीने व्हावे सर्वांना समान वेतन मिळावे स्त्रिया व मुले यांचे हितसंबंध सुरक्षित रहावेत सामाजातील दुबळ्या वर्गांना म्हणजेच अनुचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महिला यांना प्रगती करण्याची संधी मिळावी म्हणून हे तत्त्व स्वीकारले आहे आर्थिक विषमता कमी व्हावी ही त्या मागची प्रमुख प्रेरणा आहे आर्थिक समतेशिवाय केवळ राजकीय स्वातंत्र्याला महत्व होणार नाही असे मत बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले.
बहुजन जनता दल अकोला जिल्हा शाखेच्या वतीने २६ जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे आयोजन अकोला शहरातील शिवणी शिवर एमआयडीसी परिसरात करण्यात आले होते तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून पंडित भाऊ दाभाडे बोलत होते
सुरक्षा व आरक्षणाची हमी देणारे आर्थिक स्वातंत्र्य नसेल म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आर्थिक न्यायाचे तत्व देताना देशाचे विकासात सत्ता व शासनात भागीदारी देण्यासाठी व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय समाजाची शिफारस केली आहे जोपर्यंत शासन प्रशासन या वर्गाचे प्रमाण वाढेल तेव्हाच आर्थिक समानता निर्माण करणे शक्य आहे असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई यांनी केले होते सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पंडित भाऊ दाभाडे यांच्या हस्ते ध्वजावरण करण्यात आले
यावेळी रमेश तायडे दीपक शेवाळे अन्वर शेख सुभाष इंगळे धनराज माने दिपक कांबळे विशाल खंडेराव सचिन गोस्वामी तुलसीदास तरडे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब गायकवाड नाथसागर पळसकर किशोर राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे शांताराम गावंडे हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश प्रधान यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष गवई यांनी केले.