कारंजा (लाड) : शासनाच्या निर्देषानुसार कारंजा तहसिल कार्यालयाचे विद्यमान तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी पत्रकारांना दिलेल्या लेखी प्रसिद्धी पत्रकामधून कळवीले की, "कारंजा तालुक्यातील संजय गांधी योजना विभागाच्या श्रावण बाळ योजना व संगायो लाभार्थी, ज्येष्ठ वयोवृद्ध,दिव्यांग व दुर्धरआजारग्रस्त,विधवा, परित्यक्त्या,अन्यायग्रस्त महिला व लाभार्थी व्यक्तींनी आपल्या आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते पुस्तक झेरॉक्स प्रत देवून शासनाला सहकार्य करावे.अन्यथा यापुढे लाभार्थी वयोवृद्ध,दिव्यांग,दुर्धर आजारग्रस्त,विधवा व परित्यक्ता महिलांना निवृत्ती वेतन अनुदानाचा लाभ मिळणार नाही." यापुढे सर्व निराधार लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण योजनेच्या अंतर्गत महा.आय.टी. विकासात्मक संस्था ( डि बी टी ) द्वारे प्रत्यक्ष लाभ दिल्या जाणार आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी दि 15 मे 2024 पर्यंत कारंजा तहसिल कार्यालया इमारतीचे कक्ष क्रमांक 3 मध्ये कार्यरत संगायो विभागात आधारकार्ड व मोबाईल नंबर आणून देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे पत्रकार, संजय कडोळे यांनी कळवीले आहे.