चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीअंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील केवळराम लाकडू जगनवार यांच्या मुलाच्या किडणीच्या उपचारासाठी 25000/(पंचविस हजार रुपये)तर चौगांन येथिल सौ. मनोरथा मोरेश्वर मैद त्याचे पतीला कॅन्सरच्या उपचारासाठी 25000/-(पंचवीस हजार रुपये) यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंतजी दिघोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर धनादेशाच्या वितरणप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत तुकाराम दिघोरे,ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे,अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.