स्थानिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथे रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गीत-गायन स्पर्धा,निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. ध्वजारोहण झाल्यावर सर्व स्पर्धा सुरू करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.फुलझेले, प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.बहेकर,प्रमुख पाहुणे श्री.लाकडे ,श्री.म्हशाखेत्री,कार्यक्रमाचे परीक्षक श्री.मेश्राम, श्री.दोनाडकर,श्री.प्रधान,रांगोळी स्पर्धेचे परीक्षक कु.शेंडे,कु.सारवे, कु.डाहारे,कु.दोनाडकर,कु.देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य फुलझेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याना पुस्तकी ध्यानासोबतच कला गुणांना जागृत करणे हेच आमच्या विद्यालयाचे उद्देश आहे असे प्रतिपादन केले.तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सहारे,प्रास्ताविक लाकडे सर,आभारप्रदर्शन श्री सेलोकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.