अकोला- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना कल्याण योजना,जाहिराती वितरण,अधिस्विकृती,सन्मान योजनांचे सुलभ आणि पारदर्शक पध्दतीने लाभ मिळावेत.पत्रकारांच्या मागण्यांच्या मागण्यांवर शिघ्रगतीने निर्णय होऊन उतारवयातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानयोजनेतील निवृत्ती वेतन योग्य वेळेत मिळावे.तसेच ईतर सामाजिक साधनेत आपल्या लेखण्या झिजवणाऱ्या सर्वच पत्रकारांना आणि सोबतच श्रमिक वृत्तपत्र विक्रेत्यांना सुध्दा पात्रतेनुसार वेळीच न्याय मिळावा. यासाठी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगवेगळी स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याची मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून गेल्या साडेतीन वर्षापासून मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबधित मंत्र्यांकडे सातत्याने सुरू होती. शेवटचे विविध १३ मागण्यांचे आणखी एक पत्र दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी मा.मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते.यामध्ये महामंडळे निर्मितीच्या मागणीसोबबतच विविध कल्याण योजना,वृत्तपत्र पडताळणी,जाहिरात वितरणातील विषमता टाळून पारदर्शकतेने न्याय मिळण्यासाठी आणि सन्मानयोजनेतील निवृत्ती वेतनांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
विशेष प्रसिध्दी मोहिमेतील शासकीय योजनांच्या जाहिराती छोट्या वृत्तपत्रांना लोकस्वातंत्र्यच्या मागणीनंतरच सुरू झाल्या होत्या.त्यानंतर आता महामंडळ मंजुरातीच्या मागणीलाही यश आले असून मंत्रीमंडळाच्या झालेल्या सभेत या ह्या दोन्हीही मागण्यांना मंजुरात देण्यात आली आहे.त्यामध्ये पत्रकार महामंडळ आणि वृत्तपत्र विक्रेता महामंडळ अशी दोन स्वतंत्र मंडळाच्या निर्मितीला राज्यशासनाची मंजुरात मिळाली आहे.आजच्या सभेत एकून ८० निर्णय घेण्यात आले त्यापैकी पत्रकारांनाही त्यांच्या मागणीनीसार न्याय देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्याबध्दल मा.मुख्यमंत्री मा.उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने स्थापनेपासूनच्या साडेतीन वर्षात पत्रकार हल्ल्यांविरोधात आक्रमकपणे आवाज उठवला असून आरोपींवर अनेक गुन्हे नंतर दाखल झालेले आहेत.सात्त्याने दर महिण्याचे विचारमंथन मेळावे, मुंबईतही दर महिण्याच्या सभा सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडत विविध उपक्रमांनी महाराष्ट्रातील एक सक्रिय सेवाभावी पत्रकार संघटना म्हणून अधिकारी, राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसेचे शिक्कामोर्तब झालेली ही एकमेव संघटना असल्याच्या प्रतिक्रिया पत्रकार सर्वच क्षेत्रातून समोर येत आहेत. महाराष्ट्राशंतर संघटनेने गुजरात,आंध.रप्रदेश,कर्नाटक आणि ओरिसा या ४ राज्यातही प्रवेश केला असून तिकडेही उपक्रमांना सुरूवात होणार आहे.पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेता महामंडळाच्या मंजुरीने आणखी एका मागणीला यश आल्याने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सर्व अभिनंदन होत आहे.