दिनांक 30 एप्रिल २०२५ रोज मंगलवार कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरकडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. मैंद साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य मा. पिलारे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.!
सर्वप्रथम मा.मैंद साहेब तसेच पिलारे सर यांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केला. तसेच सर्व उपस्थित कर्मचारी वृंद यांनी पुष्य अर्पन करून अभिवादन केले.
मा.मैंद साहेब यांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला असता राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी त्यांना "तुकड्या" म्हणून हाक मारली. "तुकड्या म्हणे" असे म्हणत जा, असे सांगितले. "तुकड्या म्हणे" या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होत.ग्रामगीता या ग्रंथाचा
तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होत.
मा.पिलारे सर यांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. महाराजांचे कार्य हे आदर्श जिवनाचा मुलमंत्र देणारा आहे. त्याचे प्रत्येकाने आपल्या जिवनात महाराजांचे विचार अंगीकारले पाहीजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन ढोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.राणे सर यांनी केले.लगेचच राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.