कारंजा : कारंजा (लाड) येथील रहिवाशी असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू तथा ज्ञानेश्वरजी कडोळे यांचे पुतणे,श्री कामाक्षा देवीचे प्रमुख कडोळे गोंधळी घराण्यामधील श्री.उमेश मधुकर कडोळे यांचा वयाच्या ५४ व्या वर्षी,अचानक उद्भवलेल्या दुर्धर आजाराने,गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी मृत्यु झाला. उल्लेखनिय म्हणजे श्री उमेश मधुकर कडोळे हे सुप्रसिद्ध संबळवादक,डफ वादक तथा गोंधळी लोक कलाकार होते. शिवाय ते उत्तम असे साहित्यीक, कवि तथा गायकही होते.श्री. कामाक्षा मातेच्या आरत्या तथा अनेक गोंधळी गीताच्या त्यांनी रचना केलेल्या आहेत.त्यांचे गोंधळाचे कार्यक्रम आकाशवाणी केन्द्रावरूनही प्रसिद्ध झाले आहेत.एक हरहुन्नरी कलाकार असतांनाही ते प्रामाणिक,विश्वासू,शांत,संयमी हास्यमुख होते.त्यांच्या निधनाने कडोळे परिवाराची अपरिमित हानी झाली असून,समाज एका हर हुन्नरी कलाकाराला मुकला आहे.त्यांच्या मागे पत्नी,वयोवृद्ध माता,वडिल बंधू,दोन बहिनी, काका काकू,चुलतभाऊ,पुतणे असा परिवार असून दि.१९ जून रोजी सायंकाळी ०८:०० वाजता,अकोला येथील हिंदु स्मशान भूमि अकोला येथे त्यांचा अंत्यविधी पार पडला.याप्रसंगी आप्त स्वकियांसह कारंजा येथील फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी ज्येष्ठ समाजसेवी तथा पत्रकार प्रदिप वानखडे आणि गजानन चव्हाण (ठाकुर) यांनी कळवीले आहे.