लाखनी स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अशोक लेलॅण्ड कंपनीसमोरील सागर राजू निखाडे (रा. सेलोटी) व सुखदेव श्रीराम मस्के (रा. लाखनी) नवीन घर बांधकामाच्या प्लॉटवरून सळाखी व टिल्लू मोटारपंप अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. राजू निखाडे यांच्या मुलगा सागर याच्या नावावरील असलेल्या गडेगाव येथील अशोक लेलॅण्ड कंपनीसमोरील प्लॉटवर मे महिन्यापासून नवीन घराचे बांधकाम सुरू होते.