अर्धा एकर शेतीवर घेतलेले कर्ज तसेच लोकांकडून हातउसने मागितलेले पैसे कसे परतफेड करायचे या विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पवनी तालुक्यातील आकोट येथे ९ जुलै रोजी घडली. सोमेश्वर श्यामराव जिभकाटे (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पवनी तालुक्यात सध्या पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे. अकोट येथे सोमेश्वर श्यामराव सोमेश्वर जिभकाटे जिभकाटे याने अर्धा एकर शेतीवर कर्ज घेतले. तसेच हातउसने पैसे घेऊन शेती केली. अशातच पावसाचा खेळखंडोबा सुरू असल्याने सोमेश्वर याने याच्या
मनावर परिणाम झाला. यातूनच त्याने स्वतःच्या राहत्या घराच्या धाब्यावर जाऊन नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. वडील श्यामराव जिभकाटे जनावरांसाठी चारा काढण्यासाठी धाब्यावर गेले असता त्यांना मुलाने गळफास लावल्याचे दिसून आले. अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार सुभाष मस्के करीत आहेत.