गडचिरोली
चामोर्शी येथील पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभगात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक श्रीमती वनिता प्रभाकर तावाडे, वय ५३ वर्षे यांनी २५,०००/- रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार हे मु.पो. जांभळी ता. धानोरा जि. गडचिरोली येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात. तकारदार यांचे आईचे नावे सातव्या वेतन आयोगानुसार कुटुंब निवृत्ती वेतनाचे एरीयसची रक्कम काढून देण्याचे कामाकरीता आरोपी श्रीमती बनिता प्रभाकर ताबाडे, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती चामोर्शी, ता.चामोर्शी जि. गडचिरोली यानी ३०,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे प्रत्यक्ष येवून तकार नोंदविली.
तकारदार यांनी दिलेल्या तकारीनुसार पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, ला.प्र.वि. गडचिरोली यांनी तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईने आयोजन केले असता कनिष्ठ सहाय्यक श्रीमती वनिता प्रभाकर तावाडे यांनी पडताळणी दरम्यान तक्रारदाराच्या आईचे नावे सातव्या वेतन आयोगानुसार कुटूंब निवृत्ती वेतनाचे एरीयसची रक्कम काढुन देण्याचे कामाकरिता ३०,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती २५०००/- रुपये लाच रक्कम मौजा चामोर्शी पंचायत समिती कार्यालय मेनगेट जवळ स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडले. त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन, चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पोनि श्रीधर भोसले, सफी प्रमोद ढोरे, पोहवा धोटे, पोना राजेश पदमगिरवार, किशोर जीजारकर, श्रीनिवास संगोजी, मपोशि विद्या म्हशाखेत्री, मपोशि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे व सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....