कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : मानवी जीवनातल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याकरीता आणि सर्वच प्रकारच्या शासकिय योजनांचा लाभ मिळविण्याकरीता, शासनाकडून,आधारकार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले असून जवळ जवळ प्रत्येक नागरिक मुले,मुली,युवक, युवती,वयोवृध्द स्त्री पुरुषांकडे हे आधारकार्ड आहे.
आधार नोंदणीच्या दहा वर्षानंतर मात्र हे आधार कार्ड (update) अद्यावत करणे अत्यावश्यक व गरजेचे आहे.तसेच नव्याने जन्माला आलेल्या बाळापासून म्हणजेच 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांचे सुद्धा आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार केन्द्रावर जाऊन,आपल्या प्रत्येक बालकांची नोंदणी करावी. त्याकरीता आधारकार्ड धारकाने आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणून, चालू महिन्याचे विद्युत देयक (इलेक्ट्रीक बिल),रेशनकार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, बँकेच्या पासबुकाची प्रत व आधारकार्ड धारकाचा एक पासपोर्ट सोबत घेऊन आधार केन्द्रावर जाऊन आपले आधारकार्ड अद्यावत करून घ्यावे.येत्या दि 14 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना आधारकार्ड ऑनलाईन पद्धतीने (update) अद्यावत करण्याकरीता मुदत देण्यात आलेली आहे. त्याकरीता https://myaadhaar.uidai.gov.in/ ही लिंक देण्यात आलेली आहे.तरी आपल्या तालुक्यात ग्रामिण व शहरी भागातील सर्व कारंजेकर नागरिकांनी आपली आधारकार्ड अद्यावत करण्याचे आवाहन कारंजा येथील तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.