वाशीम : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत असल्याची माहिती थेट मंत्रालयातून प्राप्त झाली असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार असून त्या अंतर्गत रु.२५,०००/- प्रमाणे भांडवली अनुदान प्रत्येक मंडळांना वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दस्तुरखुद्द सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ ते ०६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटना अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले आहे.