ब्रह्मपुरी :-
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात महीला बचतगट आहेत. पैशांची बचत व्हावी या हेतूने महीला बचत गटांमध्ये सामील होतात. बचत गटांमध्ये सामील झाल्यानंतर फक्त गटातील महिलांना पैसे व्याजाने देणे इतक्यापुरत मर्यादित न राहता अभियानाच्या मार्गदर्शनातून बचतगटाच्या महिलांनी व्यवसाय उभारुन आर्थिक उन्नती केलेली आहे आणि तेच करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी केले.
ते ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मंगल महीला प्रभागसंघ गांगलवाडी-मेंडकी यांच्या वतीने वार्षिक अधिवेशन आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलाताई इरपाते सरपंच ग्रा.पं.मेंडकी, प्रमुख पाहुणे मा.श्री.मनोजजी मेश्राम तालुका अभियान व्यवस्थापक, मा.श्री.दिनेशजी जांभुळकर व मा.श्री.अमोलजी मोडक, तालुका व्यवस्थापक, मा.सौ.वंदनाताई शेंडे,माजी सभापती पं.स.ब्रम्हपुरी, सौ.सुनिताताई ठवकर माजी उपसभापती पं.स.ब्रम्हपुरी, सौ.उषाताई बनकर सरपंच ग्रा.पं. मांगली, सचिनभाऊ गुरनुले उपसरपंच ग्रा.पं.मेंडकी, राजेंद्रजी आंबोरकर, सौ.कुंदाताई कुरेवार, सौ.मोक्षालीताई शेंडे, सौ.जयश्रीताई आंबोरकर, चिंतामणीजी जेल्लेवार, सुधाकरभाऊ महाडोळे, सौ.योगीताताई जेल्लेवार सदस्य ग्रा.पं.मेंडकी,मा.सौ.रजनीताई भोयर अध्यक्ष गाव तंटामुक्त समिती मेंडकी, अरविंदजी लांजेवार ग्रा.वि.अ, अक्षयजी भैसारे व्यवस्थापक वि.को.ग्रा.बँक, प्रभाग समन्वयक प्रविणजी सायंकार व सौ.गोपिकाताई येटे, प्रकाशजी अलोणे, दयानंदजी बाकमवार व मा.छत्रपती बगमारे समुदाय कृषी व्यवस्थापक, पवनजी बारसागडे, भाऊदासजी बनकर श्री.सोपानजी तोडासे समुदाय पशू व्यवस्थापक व मा.सौ.निराशाताई गेडाम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ.बबीताताई शेंडे तर लेखाजोखा वाचन सौ.शीलाताई गोंदोडे, प्रास्ताविक सौ.अर्चनाताई सहारे व आभार प्रदर्शन सौ.ईशाताई ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील समूह संसाधन व्यक्ती, आरोग्य व पोषण सखी, कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी, बँक सखी प्रभागातील ग्रामसंघ व प्रभागसंघ पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....