दिनांक २७ सप्टेंबर २०२५ ला यश्वदाबाई किरणापूरे यांच्या स्मृती दिनानिमित्य विवेकानंद विद्यालय आरमोरी येथील वर्ग ५ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. के . टी . किरणापूरे यांनी आपल्या मातोश्री यांच्या स्मृती दिना निमित्य नोट बुक वाटप केले.
या प्रसंगी त्यांनी आपल्या आईने स्वतः निरक्षर असून सुद्धा आम्हा सर्व भावंडांना योग्य शिक्षण देऊन चांगल्या प्रकारचे संस्कार दिले , आई आपल्याला शक्ती धर्य आणि शिकवण देते ती आपली पहिली शिक्षिका आणि मार्गदर्शन करू शकतो असे गौरोद्गार काढले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद वठे सर व जवाहर विद्यालय जोगीसाखरा शाळेचे . मुख्याध्यापक क्रिष्णाजी खरकाटे सर उपस्थित होते त्यांनी सुद्धा जीवनात आईचे अनन्य साधारण महत्व आहे हे अनेक दाखले देऊन विशद केले . या प्रसंगी शाळेतील शिक्षक सतीश धाईत सर, जीवन गणभोज सर, शुभदा बेदरे मॅडम व प्रीया अवचट मॅडम आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश बावनकर यांनी तर आभारप्रदर्शन जयप्रकाश दहीकर सरांनी केले .
यावेळी विद्यार्थ्यांना आई संदर्भात माहिती मिळून नोटबुक मिळाल्याने आनंद व्यक्त केला.