खासदार राहुल जी गांधी ह्यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर पर्यंत निघालेली अभुतपुर्व अशी भारत जोडो पदयात्रा नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली आहेत हि यात्रा दि. 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर ह्या कालावधीत राज्यात राहणार असून राज्यातील 5 जिल्ह्यातुन हि जाणार आहे. गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी व अमित शाह ह्यांनी देशात जे द्वेषाचे राजकारण व भीती चे वातावरण निर्माण करुन ठेवले आहे ह्याच्या विरोधात व केंद्र सरकारची वास्तविकता जनते समोर येण्यासाठी म्हणुन कांग्रेस चे खासदार राहुल जी गांधी यांनी कांग्रेस कार्यकर्त्यांच्या व विविध घटकांच्या सहकार्याने 150 दिवस चालणारी 3570 कि. मी पर्यंतची भारत जोडो पदयात्रा मोठ्या आत्मविश्वासाने व साहसा ने सुरू केली असून ह्या पदयात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. इतर विरोधी पक्षनेते मोदी शाह ह्यांच्या समोर लोटांगण घालत असतांना राहुल गांधी एकटेच मोदी शाह ह्यांच्या जुलूमशाही व देशातील खालच्या पातळीवर आलेल्या राजकारणाविरोधात संघर्ष करीत आहेत गांधी घराण्याचा आजपर्यंत चा संघर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर म्हणावसं वाटतं की गांधी होणं मुळातच सोपं नाही
राहुलजींच्या ह्या पदयात्रेला कोटी कोटी शुभेच्छा....!

हो पण मुळात हे सोप नाही हो.. ! देश भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. 75 वर्षांपूर्वी मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने मिळालं असलं तरी महात्मा गांधी सह अनेक विभुतींनी मोठा संघर्ष त्यावेळी केला.देश स्वतंत्र झाल्यानंतर बिगर काँग्रेसी सरकार चे सत्तेचे काही वर्ष सोडले तर देशात बहुतांश वेळा कांग्रेसचेच सरकार राहिले आहे आधुनिक भारताचे शिल्पकार पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा पद सांभाळले तेंव्हा त्यांच्या जवळ फार मोठी पुंजी नव्हती तुटपुंज्या पुंजीत नेहरुजींनी देश चालवायला घेतला पण अश्याही परिस्थितीत वर्तमान व भविष्यातही देशाची स्थिती चांगली रहावी म्हणून आर्थिक , सामाजिक , राजकीय , राष्ट्रीय सुरक्षा व औद्योगिक क्षेत्रात सुधारणा व्हावी म्हणून अनेक मोठमोठ्या कंपन्या व महत्त्वाकांक्षी योजना देशात आणल्या देशासाठी समर्पणाची भावना ठेवणाऱ्या नेहरू गांधी घराण्याने अनेक अडचणींवर मात करून देश स्वतंत्र झाल्यानंतर जिथे सुई बनत नव्हती तिथे देशाला महासत्तेच्या उंबरठ्यावर आणुन ठेवले आज मात्र नरेंद्र मोदी ह्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी देशातील जनतेला दिलासा देणारे डझन दोन डझन आश्र्वासन दिले होते. 26 में 2014 रोजी सत्तेवर आलेल्या मोदी - शाह ह्या जोडीला मात्र आजपर्यंत ह्यातील एक ही आश्र्वासन पूर्ण करता आले नाही उलट महागाई ने उच्चांक गाठला , बेरोजगारी वाढतच चालली आहे.सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडीयन इकोनाॅमी च्या नुसार आॅगष्ट 2022 पर्यंत बेरोजगारी चा दर हा 8.3 टक्के होता आणि युवकांच्या बेरोजगारी चा दर हा तर 42 टक्क्यापर्यंत गेला आहे. विदेशातील काळं धन तेही आलं नाही , प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यात 15 लाख टाकणार होते आजपर्यंत एक रुपया ही नाही आला , शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडले आहे. जीडीपी दर खाली आला आहे. सीबीआय , ईडी व आयकर विभागाच्या मार्फत धाडी टाकून विरोधी पक्षांचे सरकारे पाडण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. देशात द्वेषाचे व भीती चे वातावरण निर्माण करुन निव्वळ जातीपाती चे राजकारण व जातीपाती मध्यें भांडण लावण्याचे काम सुरू आहे आणि देशातुन भीती व द्वेषाचे वातावरण दुर करुन जनतेचे आपसातील मन जुळवून घेण्यासाठी म्हणुन कांग्रेस चे खासदार राहुल जी गांधी यांनी 150 दिवस चालणारी कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर ह्या 3570 किलोमीटर पर्यंत ची "भारत जोडो" यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. ह्या यात्रेमुळे देशभरातील कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्यमय वातावरणच निर्माण झाले नाही तर यात्रेच्या माध्यमातून सामाजिक सदभाव व मूलभूत संवैधानिक मुल्य सुदृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

"हो पण मुळात हे सोप नाही हो"
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो आणि विश्र्वातील असा एकमेव देश आहे जिथे विविध धर्म जाती, पंथ व संप्रदायाच्या माध्यमातून नैतिक मुल्याची जबाबदारी स्वीकारून ती पार पाडल्या जाते , विचार मुल्य , मानवी मुल्य , शिक्षण मुल्य , संस्कृती मुल्य असो अथवा सामाजिक मुल्य ती जपून सर्व धर्मसमभावाची बीजे रोवल्या गेली आणि हे बीजं रोवण्याचे महान कार्य काँग्रेस कडून घडलं हे इथे अभिमानाने नमुद करावसं वाटतं

कांग्रेस म्हणजे गांधी व गांधी म्हणजे कांग्रेस हे समीकरण झाले आहे पण सत्तेसाठी गांधी व गांधीसाठी सत्ता हे समीकरण मात्र कधीच जुळलं नाही. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी ह्यांच्या नंतर सत्तेची संधी उपलब्ध झाल्या नंतर सुध्दा खा. सोनियाजी गांधी ह्या माऊली ने मोठ्या विनम्रतेने पंतप्रधान पद नाकारुन जगप्रसिध्द अर्थतज्ञ डॉ मनमोहनसिंग यांना पंतप्रधान केले. राहुल जी सुध्दा पंतप्रधान होऊ शकत होते पण ते मंत्रीमंडळात साधे मंत्री सुध्दा झाले नाही. ऊन वारा पाऊस झेलत केवळ आणि केवळ कांग्रेस साठी पर्यायाने देशातील जनतेच्या कल्याणासाठी गांधी परिवार आपलं आयुष्य खर्ची घालत आहे. इतर विरोधी पक्ष नरेंद्र मोदी - अमित शाह ह्यांच्या समोर लोटांगण घालत असतांना व स्वता:वर तसेच आई वर जी आजारी आहे त्या सोनियाजी वर सुध्दा केंद्र सरकारच्या हातचे बाहुले असलेल्या ईडी ने चौकशी लावली असतांना ही राहुल जी मात्र डगमगले नाही अश्याही परिस्थितीत एकाकी झुंज देणारे राहुल जी भारतातील एकमेव राजनेता ठरले.
"हो पण मुळात हे सोप नाही हो"
एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा त्या मुलीला साधा छोटा परिवार असलेल्या सासऱ्यांकडच्या मंडळींना आपलसं करुन घेता येत नाही किंबहुना सासु सासरे नकोच असतात तिथे विदेशातील एक मुलगी राजीव जी सोबत लग्न करुन सासर असलेल्या भारता सारख्या विशालकाय देशाला आपलसं करते आणि भारतातील नागरिक ही ह्या माऊली ला स्विकारुन भरभरून प्रेम देते.
"हो पण मुळात हे सोप नाही हो"
ज्या सासरच्या घराण्याचा इतिहास इतका रक्तरंजित आहे जिथे सासु इंदिरा गांधी यांच्या वर गोळ्या झाडलेल्या पाहिल्या नंतर सोनिया जींनी स्वत:च्या नवऱ्याच्या शरिराच्या चिंधड्या चिंधड्या उडतांना पाहिल्या त्या सोनियाजी वर त्यावेळेस भाजप सहित अन्य विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची टिका करुन विदेशी हिणवत भारत सोडणार असल्याच्या वावड्या उठवल्या पण ह्या माऊली ने मात्र ह्याच देशातील जनतेसाठी सर्व दुःख विसरून व टिका सहन करुन डोक्यावरचा पदर पडु न देता संयम धारण करून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेंव्हा खरंच ह्या माऊली ला सलाम करावासा वाटला. वास्तविक पाहता आपल्या घरातील जिव्हाळ्याचे माणसे अश्या प्रकारे गमावल्यानंतर कोणता माणूस राजकारणात यायचा विचार करेल ? पण ह्मा माऊली ने मात्र मुलाबाळांच्या भवितव्याचा व सुरक्षेचा विचार न करता जनतेच्या कल्याणासाठी व देशातील लोकशाही मजबूत तसेच सुदृढ बनविण्यासाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला
"हो पण मुळात हे सोप नाही हो"
भारत जोडो यात्रा हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर पर्यंत पदयात्रा काढने मुळातच सोपे नव्हते जिथे 3 किलोमीटर चालायचे म्हटले तर धाप लागते तिथे राहुल जी 3570 किलोमीटर पर्यंतचे अंतर ऊन वारा पाऊस ह्या कशाची ही पर्वा न करता विविध घटकांच्या व कांग्रेस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पायी चालत आहे. पहिल्यांदा राहुल जी सुरक्षेची कोणतीही तमा न बाळगता मोठ्या आत्मविश्वासाने व साहसा ने व निर्धास्तपणे अगदी मोकळेपणाने फिरत आहे.
"हो पण मुळात हे सोप नाही हो"
राहुल गांधींच्या पदयात्रेत अडथळे आणण्याचे प्रकार ही अगदी केरळ व तामिळनाडू पासून सुरू झाले .कर्नाटकात भाजपच्या एक मंत्र्यांनी तर जाणुनबुजून राहुल जी च्या पदयात्रेत अडथळा आणण्यासाठी वादग्रस्त धार्मिक व्यक्तव्य केले जेणेकरून दंगली घडवून आणता येईल परंतु राज्यातील जनतेनी मात्र त्यांचा हा डाव हाणून पाडला
त्याग व बलिदानाचे प्रतिक असलेल्या गांधी घराण्यातील राहुल जी भारतात खुल्या मनाने जगता यावे तसेच देशांतर्गत वाढत असलेले विविध वाद पारिवारिक वाद, देशात वाढत असलेली समाजविघातक प्रवृत्ती , वाढत असलेले सामाजिक व राजकीय विकृती व दुरावत चाललेली कौटुंबिक जीवनातील संबंध व संवाद हे सर्व नष्ट होऊन आपसातील आपुलकी व आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी जीवाची पर्वा न करता बिनधास्त रस्त्यावर फिरताना बघुन काळजीचा ठोका चुकल्याशिवाय निश्चितच राहत नाही. जिथे जिच्या जगण्याचा आधार केवळ एकुलता एक मुलगा आहे ती आई म्हणजेच सोनिया गांधी जी तब्येत बरोबर नसतांना ही जनतेच्या कल्याणासाठी व मुलाला बळ देण्यासाठी म्हणून त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरते तेव्हा खऱ्या अर्थाने मला सोनिया जीं मध्यें अतिशय नम्र , शांत व संयमी अवतार दिसला एकुलत्या एक लेकामध्ये इतका जीव गुंतला असतांना अगदी हसतमुखाने प्रेमळ स्वभावाने मुलाला पाठिंबा देत काही अंतर चालून गेल्यावर जी आई लेकाच्या हट्टापायी पुन्हा गाडीत बसते व हट्ट पूर्ण करते तेव्हा ती माऊली नक्कीच स्वत:च्या परिवारातील रक्तरंजित संघर्ष व घातकी इतिहास विसरलेली नसेलच अश्याही परिस्थितीत राहुल व प्रियंका ह्यांना संस्काराचे व विनम्रता चे बाळकडू देणारी आई अर्थातच सोनिया जी गांधी होणे सोपे नाही मुळातच गांधी होणे सोपे नाही नव्हतं आणि असणार ही नाही.
आपल्या प्रतिक्रिया द्या....