वाशिम : अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचे आजिवन सदस्य झाल्याशिवाय तुम्हाला वृद्ध साहित्यीक कलावंत मानधन योजनेचे मानधन मंजूर करताच येत नाही.अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेकडून तुम्हाला दरमहा मानधन मंजूर केले जाते असे १००% खोटे आमिष दाखवून तुम्हाला म्हणजेच भजनी कलावंत महिला व पुरुष मंडळी,किर्तनकार, प्रवचनकार, भिमशाहिर, गायक, वाद्य वाजविणारे कलाकार व लोककलावंत यांना बळजबरीने अ भा नाट्य परिषदेचे आजिवन सदस्य बनविण्याचे प्रकार आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात झालेले असल्याचे आमच्या निदर्शनी आले आहेत. वास्तविक ह्या मंडळीचा आणि नाट्यकलेचा कोणताही संबंधच नाही.महाराष्ट्र शासनाची वृद्ध साहित्यीक लोककलाकार मानधन योजना ही सांस्कतिक विभागामार्फत चालविल्या जाते. व त्याकरीता स्थानिक स्वराज्य संस्था,विविध नोंदणीकृत सांस्कृतिक,लोककलावंत, धार्मिक आध्यात्मिक,शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून,अर्जदाराने पंधरा ते विस वर्षे पर्यंत, शासनाचे जनजागृती कार्यक्रम केले असल्याचे साक्षी पुरावे (जसे की,प्रमाणपत्र, सन्मानपत्र,पुरस्कार,वृत्तपत्रीय कात्रणे आणि कार्यक्रमाचे फोटो जोडणे गरजेचे आहे.)आमदाराच्या शिफारशीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा अंतर्गत पालकमंत्री महोदयांनी गठीत केलेल्या निमशासकिय जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती द्वारे हे मानधन मंजूर केले जाते.येथे कोठेही मानधन लाभार्थी हा अ.भा.मराठी नाट्य परिषदेचा सभासद असावा . अशी अट शासनाने घातलेली नाही.किंवा कोठेही म्हटलेले नाही.परंतु ही अट भजनी महिला पुरुष कलावंतावर, लोककलावंत, किर्तनकार,प्रवचनकार,भिमशाहीर,यांच्यावर लादून त्यांना बळजबरीने अ भा मराठी नाट्य परिषदेचा सभासद केले जातच असेल तर ती खर्याखुऱ्या नाट्य कलावंताची प्रतारणा किंवा क्रूर थट्टा आहे.आणि भजनी महिला पुरुष कलावंत, किर्तनकार,प्रवचनकार, लोककलावंताची फसवणूक आहे. महाराष्ट्राच्या लोककला म्हणजे गोंधळ,वासुदेव,जागरण,वाघ्या मुरळी,शाहिरी,किर्तन, भारुड,गवळण,कलापथक, दंढार,दशावतार ह्या परंपरागत लोककला आहेत.सध्या वाशिम जिल्हयात अ.भा.मराठी नाट्य परिषदेची निवडणूक सुरु आहे. तेव्हा भजनी महिला पुरुष कलावंताना खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या उमेद्वारांना धडा शिकविण्याची ही नामी संधी आहे.तद्वतच जिल्ह्यात प्रतारणा होत असलेल्या खऱ्याखुऱ्या नाट्य कलावंतानी सुद्धा बोध घेऊन, सत्यवचनी,प्रामाणिक,विश्वासू योग्य उमेद्वारांना निवडून आणणे गरजेचे आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....