ब्रम्हपुरी:-स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ब्रम्हपुरी येथे विद्यालयाच्या वतिने ८ एप्रिल पासुन उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्याचा समारोपिय कार्यक्रम मुख्याध्यापिका सिस्टर दिपा जोस यांच्या उपस्थितित विद्यालयात नुकताच आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा अभ्यासा व्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकास व्हावा,त्यांना विविध कला प्रकाराची गोडी लागावी तसेच शारिरिकदृष्टा तंदरुस्त व्हावे या उद्देशाने विद्यालयाने यावर्षी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले.शिबिरात ख्रिस्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच बाहेरच्या विद्यालयातिल विद्या्र्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनी सहभाग घेतला.
शिबिरात चित्रकला,नृत्य,झुंबा नृत्य,संगित तसेच विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका सिस्टर दिपा जोस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शिबिरार्थ्यांनी विविध नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.शेवटी कँम्प फायर व रेन डाँन्स चे आयोजन करण्यात आले यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त नृत्य करुन कार्यक्रमाचा आस्वाद लुटला.
शिबिरार्थ्यांना लेकराम डेंगे,सुरज मेश्राम,गोविंद करंबे,मिलिंद पाठक, नरेंद्र खोब्रागडे,गाैरव करंबे,रोहित बरडे यांनी प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.