चंद्रपूर : राजुरा तहसील कार्यालयातील महिला लिपिक सुनंदा नांदेकर कर्तव्यावर असताना कावलगोदी येथील रवींद्र राठोड तिथे आला आणि काही विचारू लागला. नांदेकर यांनी थोडा वेळ थांबा, मी सांगते, असे म्हणताच राठोड याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
तहसीलदार हरीश गाडे यांच्या आदेशानुसार नांदेकर यांनी राजुरा पोलिसांत तक्रार दिली. ही घटना गुरुवारी घडली. तक्रारीवरून राजुरा पोलिसांत कलम 353, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या गावाला गेले. मात्र, घरी कुलूप लावून आरोपी फरार झाला होता.