सव्वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मूकनायक विचार मंचच्या वतीने संविधान दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला,वाशीम शहरातील आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संविधान गौरव रॅली पाटणी चौक मार्गे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचण करून समारोप करण्यात आला या रॅलीत भारताचा प्राण आहे.
संविधान,
तयाला जाणुन घेई घेई
जाणता जाणता जाणसी स्वतः
तव जिवनाला अर्थ येई
यासह संविधानावर आधारित अभंग पोवाडे व भारुड च्या माध्यमातून संविधान गौरव रॅली
जयघोष करीत वाशीम शहर दुमदुमून गेले या रॅलीत जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील,वाशीम शाखा कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग वाशिम चे पी. एस.खंदारे, महिला विभाग कार्यवाह तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती वाशीम चे कुसुमताई सोनुने, शाहीर दतराव वानखेडे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह नाजुकराव भोंडणे,मुकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजु दारोकार, उपाध्यक्ष सुखदेव काजळे, कोषाध्यक्ष निलेश भोजणे,बाल कल्याण समिती चे विनोद पट्टेबहाद्दुर,आदीं सहभागी होते. लक्ष्मी माता भजनी मंडळ रामगाव चे हभप जनार्दन भोंडणे महाराज व त्यांच्या महिला भजनी मंडळी सह सहभागी सर्व कलाकार मंडळीचा संविधान पुरस्कार जेष्ठ पत्रकार तथा सत्यशोधक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद पौळकर, परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, महाराष्ट्र अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील, मूकनायक विचार मंचचे अध्यक्ष राजू दारोदार, उपाध्यक्ष सुखदेव काजळे, महिला विभाग कार्यवाह कुसुमताई सोनुने यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.संविधान गौरव रॅलीची भुमिका व प्रास्ताविक पी.एस. खंदारे यांनी केले तर आभार मूकनायक विचार मंचचे अध्यक्ष राजू दारोदार यांनी मानले. असे वृत्त विदर्भ लोकककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.