आरमोरी :-
शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजने अंतर्गत मोफत गणवेश वितरित केल्या जाते. यावर्षी २०२४-२५ सत्रातील शाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले नाही. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष धुरंधर सातपुते, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष देवानंद बोरकर, शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल राचमलवार, महिला तालुका अध्यक्षा वृषाली भोयर, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे,योगेश कापकर, शहर सरचिटणीस राकेश बेहरे, श्रीधर पोटेकर, संतोष भोयर उपस्थीत होते.
त्याचप्रमाणे आरमोरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळांमध्ये जवळपास शंभर शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील काही दिवसापूर्वी शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात हजारो पदवीधर, पदव्युत्तर, डि. एड., बि. एड. धारक युवक बेरोजगार असताना त्यांचा विचार न करता सेवानिवृत्त शिक्षकांना शिक्षकांच्या रिक्त पदासाठी अर्ज मागवणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार युवकांवर अन्याय करणे आहे.
त्यामुळे स्थानिक पदवीधर, पदव्युत्तर, डि. एड., बि. एड धारक बेरोजगार युवक उमेदवारांमधूनच शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....