अकोला दि, राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी बहुजन जनता दल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,भारतीय राष्ट्रवादी पार्टी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(सेक्युलर)रिपाई. (बी सी कांबळे गट) यांच्यासह समविचारी पक्ष .आघाडी तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेशी युती मुंबई ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर नागपूर अमरावती अकोला औरंगाबाद नाशिक कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सह राज्यात होत असलेल्या ठिकाणच्या महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भाऊ दाभाडे यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांची बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नुकतीच भेट घेऊन राज्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी बहुजन जनता दल व समविचारी पक्षांची तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेशी युती संदर्भात चर्चा केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन जनता दल यांच्या राज्यस्तरीय युती संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्याशी बोलताना सांगितले.
राज्यस्तरीय बैठक लवकरच अकोला येथे घेऊन बहुजन जनता दल .पीपल्स रिपब्लिकन पार्टी .भारतीय राष्ट्रवादी पार्टी. रिपाई सेक्युलर रिपाई बी सी कांबळे गट.व समविचारी पक्ष्यांशी तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकार्यांशी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे.आणि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये युती संदर्भात सविस्तर चर्चा करून व विचार नियम करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे. अकोला येथे लवकरच होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशकार्याध्यक्ष. चरणदासजी इंगोले. पिरीपा नेते आबा सिरसाट. महादेवराव शिरसाट अकोला जिल्हा अध्यक्ष. शैलेंद्र वानखडे अकोला शहराध्यक्ष व बहुजन जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय वानखडे
बहुजन जनता दलाचे प्रदेश संघटक अंकुश पवारे. बहुजन जनता दलाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष. गुणवंतराव काटेकर. बहुजन जनता दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई. बहुजन जनता दलाचे वैद्यकीय कामगार आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष विलास मोरे. बहुजन जनता दलाचे अकोला शहराध्यक्ष हिम्मतराव पाटील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर प्रदेश संघटक भाऊराव वानखडे भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मनीषजी दाभाडे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (बि सि कांबळे गटाचे पुणे शहर अध्यक्ष आनंद सदानंद कांबळे) यांच्यासह अनेक नेते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेव्हा बहुजन जनता दल पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि समविचारी पक्ष्यांच्या तर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते बाबा शिरसाट माजी जिल्हाध्यक्ष महादेव शिरसाट अकोला शहराध्यक्ष शैलेंद्र वानखडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर भाऊराव वानखडे यांनी केले आहे